22 Pratigya by Dr. Ambedkar in Marathi
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्धांना दिलेल्या २२ प्रतिज्ञा खालीलप्रमाणे आहेत.
- मी ब्रह्मा, विष्णू, महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.
- मी राम व कृष्ण यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.
- मी गौरी-गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देव-देवतेस मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.
- देवाने अवतार घेतले, यावर माझा विश्वास नाही.
- गौतम बुद्ध हा विष्णूचा अवतार होय, हा खोटा आणि खोडसळ प्रचार होय असे मी मानतो.
- मी श्राद्धपक्ष करणार नाही; पिंडदान करणार नाही.
- मी बौद्धधम्माच्या विरुद्ध विसंगत असे कोणतेही आचरण करणार नाही.
- मी कोणतेही क्रियाकर्म ब्राह्मणाचे हातून करवून घेणार नाही.
- सर्व मनुष्यमात्र समान आहेत असे मी मानतो.
- मी समता स्थापन करण्याचा प्रयत्न करीन.
- मी तथागत बुद्धाने सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा अवलंब करीन.
- तथागताने सांगितलेल्या दहा पारमिता मी पाळीन.
- मी सर्व प्राणिमात्रावर दया करीन, त्यांचे लालन पालन करीन.
- मी चोरी करणार नाही.
- मी व्याभिचार करणार नाही.
- मी खोटे बोलणार नाही.
- मी दारू पिणार नाही.
- ज्ञान (प्रज्ञा), शील, करुणा या बौद्धधम्माच्या तीन तत्त्वांची सांगड घालून मी माझे जीवन व्यतीत करीन.
- माझ्या जुन्या, मनुष्यमात्राच्या उत्कर्षाला हानिकारक असणाऱ्या व मनुष्यमात्राला असमान व नीच मानणाऱ्या हिंदू धर्माचा मी त्याग करतो व बौद्धधम्माचा स्वीकार करतो.
- तोच सद्धम्म आहे अशी माझी खात्री पटलेली आहे.
- आज माझा नवा जन्म होत आहे असे मी मानतो.
- इतःपर मी बुद्धाच्या शिकवणुकीप्रमाणे वागेन अशी प्रतिज्ञा करतो.
Also check – 22 vows by Dr. Ambedkar in Hindi and English.
JAY BHIM
Jay bhim
Sir, please rectify the translation of 22 prestigious pledges given by Dr Babasaheb Ambedkar on the Dhammapravartan day which we get to read in Marathi.
Sir Dr Babasahab mentioned the very first pledge as ” I shall not consider Brahma, Vishnu and Mahesh as God, nor shall I worship them.”
However, it has been translated as ” मी ब्रह्मा, विष्णू, महेश यांना देव माननार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. ” which is a very big contrast in the meaning by using ‘किंवा’ word. I think this word should be replaced by another appropriate word like आणि, ना ।
I might be wrong but if I am not wrong, the necessary step must be taken as soon as possible to give it more meaningful touch.