काळाराम मंदिर प्रवेश संघर्षाच्या ९० वर्षानंतर दलितांसाठी काय बदलले?


२ मार्च २०२० या दिवशी बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या काळाराम मंदिर प्रवेश चळवळीचा ९० वर्षे पूर्ण झाली. अस्पृश्य समाज हिंदू (ब्राम्हणवादी) धर्माचा भाग मानला गेला, अजूनही तोच समज आहे परंतु ब्राम्हणांच्या नियंत्रणाखाली असलेल्या मंदिरात अस्पृश्य समाजाला प्रवेश नाही.

बहुदा, हिंदू धर्म हा एकमेव असा धर्म आहे जो त्याच्या बहुतांश अनुयायांना मंदिर प्रवेश नाकारतो. जगभरात असा दुसरा कुठलाही धर्म तुम्हाला आढळणार नाही जो स्वधर्मिय लोकांना इतक्या मोठ्या संख्येनं मंदिर प्रवेश नाकारतो.

बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली झालेल्या नाशिकच्या काळाराम मंदिर प्रवेश चळवळीपूर्वी सुद्धा अस्पृश्यांचे मंदिर प्रवेशासाठी विविध संघर्ष झालीत ज्यांना फारसे यश लाभले नाही. सन १८७४ मध्ये मद्रास राज्यात अस्पृश्यांनी मीनाक्षी मंदिरात प्रवेश करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. सन १९२४ मध्ये पेरियार यांनी त्रावणकोर राज्यातील वायकोम येथे मंदिर प्रवेश आंदोलन सुरू केले. अमरावती मध्ये अंबा देवीच्या मंदिरात प्रवेशासाठी फेब्रुवारी १९२८ ला सत्याग्रहाची सुरुवात झाली. परंतु त्यास फारसा पाठिंबा मिळू शकला नाही. या व्यतरिक्त पुण्यातील पार्वती मंदिर प्रवेशासाठी ऑक्टोंबर १९२९ मध्ये संघर्षाला सुरुवात झाली व तो तथाकथित उच्च जातीय लोकांच्या हृदय परिवर्तन अभावी सन १९३० पर्यंतच चालू शकला.

मार्च १९३० च्या सुरुवातीस बाबासाहेब आंबेडकरांनी नाशिक येथील काळाराम मंदिर प्रवेश चळवळीला सुरुवात केली. अनेकांचा असा समज आहे की, जसा त्यांचा पाण्याच्या हक्कासाठी महाडच्या सत्याग्रहात सहभाग होता तसा या आंदोलनात सहभाग नव्हता. या काळात बाबासाहेब गोलमेज परिषदेच्या तयारीत व्यस्त असल्याने ते इथे संघर्षाच्या प्रत्येक टप्प्यात सहभागी होऊ शकले नाही परंतु त्यांचे प्रमुख सहकारी (भाऊराव गायकवाड, अमृतराव, पी. एन. राजभोज व इतर) यांनी चळवळीची सर्व जबाबदारी उत्त्तम रित्या पार पडली. सांगायचे झाल्यास, माझ्या अंदाजानुसार बाबासाहेबांना अशा ब्राम्हणवादी मंदिरात अस्पृश्यांनी जावे अशी इच्छा नसावी आणि कदाचित त्यांना अस्पृश्यांच्या मंदिर प्रवेश संघर्षाचा अस्पृश्यांना पुर्वी आलेले अनुभव अवगत असावे. या व्यतरिक्तही इतर काही कारणे असू शकतील आणि हे फक्त माझे अनुमान आहेत! असे असूनही त्यांनी अस्पृश्यांना मंदिर प्रवेश करण्याच्या अधिकारासाठी संघटित केले. मंदिर प्रवेश संग्राम चळवळीच्या निमित्ताने सुमारे १५००० अस्पृश्य लोक बाबासाहबांसोबत या चळवळीत सामील झाले.

Read also:  What US President Barack Obama said on Dr B R Ambedkar?

अस्पृश्य समाजाने मोठ्या संख्येनं काळाराम मंदिर प्रवेश चळवळीत भाग घेतला आणि हे सन १९३४ पर्यंत तसाच सहभाग चालू राहिला. या चळवळी दरम्यान सवर्ण हिंदू समजातील लोकांनी अस्पृश्य समाजावर विविध हल्ले केले. त्या भागात वारंवार कलम १४४ लागू केल्याने कित्येक अस्पृश्यांना अटक करण्यात आली होती. या आंदोलनात दलीत महिलांचा सहभाग उल्लेखनीय होता.

गांधींनी आपल्या यंग इंडिया या वृत्तपत्रामध्ये काळाराम मंदिर प्रवेश संघर्षाचा उल्लेख केला आणि तथाकथित उच्च जातींच्या लोकांना अस्पृश्य समाजाच्या मंदिर प्रवेशाला विरोध करू नये हे सांगायचे सोडून उलट अस्पृश्यांनी मंदिर प्रवेश चळवळी मागे घ्याव्यात असा उपदेश दिला. असे जातीवादी होते “महात्मा” गांधी! बाबासाहेबांनी तथाकथित उच्च जातीच्या लोकांचे मन आणि विचार बदलतील याबाबतचा विश्वास संपूर्णपणे गमावला जेव्हा सन १९३४ मध्ये काळाराम मंदिर प्रवेश संघर्ष थांबविण्यात आला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना माहीत होते ही मंदिर प्रवेश अस्पृश्यांच्या समस्या सोडवू शकणार नाही परंतु अस्पृश्यांना त्यांच्या हक्कासाठी एकजूट कार्यासाठी त्यांनी ही मंदिर प्रवेश चळवळ सुरू केली. डॉ. आंबेडकरांना अस्पृश्यांसाठी मंदिर प्रवेश करण्याचा हक्क हवा होता कारण तो इतर प्रत्येकाला होता. काळाराम मंदिराच्या संघर्षानंतर ९० वर्षे उलटून गेली तरी दरम्यान काही बदलले आहे असे वाटते का?

Read also:  Bluff Master (Boose Basiye) and Band Master

होय, दलित समाज आज त्याच्या अधिकराबद्दल जागृत आहे, आणि आपल्या हक्कासाठी संघर्ष करण्यासाठी तो तयार आहे. तेव्हा बाबासाहेबांचा मंदिर प्रवेश चळवळीचा हेतू साध्य झाला असे म्हणण्यास हरकत नाही. पण काय ही ब्राम्हणवादी मंदिरे दलितांसाठी खुली आहेत काय? क्वचितच! आजही दलितांना मंदिर प्रवेश नाकारला जातो, त्यांना शिक्षा केली जाते, धिंड काढली जाते, दंड ठोठावला जातो जेव्हा ते मंदिर प्रवेश करण्याचा प्रयत्न करतात.

आता दलितांना असल्या ब्राम्हणवादी मंदिरात प्रवेश नको आहे. उलट इथली ब्राम्हणवादी लोकचं त्यांना मंदिराकडे ओढू पाहत आहेत. दलितांना समजलं आहे की त्यांनी ब्राम्हणवादी मंदिरात दान केलेले पैसे त्यांच्याच विरोधात वापरले जातात. आणि अशा मंदिरांना देणगी न देण्याचे कार्य हेच दलितांचे सर्वोत्तम कार्य होईल, हे त्यांना आता पटलंय. तेथे जमा झालेला पैसा दलित – मुस्लिम समाजाच्या विरोधात वापरला जातो. जर दलित, बहुजन समाजाने अशा ब्राम्हणवादी मंदिरांना देणग्या, दान देणे थांबविले तर त्यांनी आपल्या विरुद्ध चालविलेल्या द्वेषयुक्त मोहिमेला संपूर्ण आळा बसेल. जेव्हा देशाच्या राष्ट्रपतीला दलित असल्या कारणाने ब्राम्हणवादी मंदिरात प्रवेश नाकारला जातो तेव्हा या तथाकथित उच्च जातीच्या लोकांच्या अंतःकरणात आता बदल होईल असं आपल्याला वाटत का? याबाबत मला फार शंका आहे.

लेखक – परदीप अत्री
अनुवाद – प्रशांत भवरे
(सदर इंग्रजी मधील मूळ लेख velivada.com वर दिनांक २ मार्च २०२० रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे)

Read in English – 90 Years After Kalaram Temple Entry Struggle, What Has Changed For Dalits?

Sponsored Content

+ There are no comments

Add yours